पतंजली देणार ‘इतक्या’ लाख नोकऱ्या; बाबा रामदेव म्हणाले…

दिल्ली :

सध्या प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबांची पतंजली कंपनी जोरात आहे. या आर्थिक वर्षात पतंजली आयुर्वेद या कंपनीने जोरदार नफा कमावलेला आहे. कोरोनाच्या काळात कोरोनील या कंपनीने जोरदार मुसंडी मारत आर्थिक मार्केट काबीज केले आणि कंपनीला कोट्यावधी रुपयांचा फायदा मिळवून दिला. दरम्यान आता पतंजली आयुर्वेद कंपनी येत्या काळात 5 लाख तरुणांना रोजगार देणार असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी दिली आहे.

न्यूज 18 हिंदीला मुलाखत देताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मी आणि आमची संस्था लोकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी प्रयत्न करत आहोत. येत्या काळात 5 लाख तरुणांना रोजगार पतंजली कंपनीतर्फे दिला जाणार असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला.

भारताबाहेरच्या कंपन्या आपल्या देशाला लूटत आहेत. जी लोकं ऑक्सफर्ड, हॉर्वर्ड आणि केंम्ब्रिज विद्यापीठामधून शिकून आले आहेत त्यांना हा बाबा रामदेव स्वत:च्या गुरुकूलमध्ये शिकवणार आहे. यावर्षी पतंजली कंपनीचा टर्नओव्हर 25 हजार करोड होणार आहे, असेही पुढे त्यांनी आपल्या व्यवसायाबद्दल बोलताना सांगितले.

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अनेकांनी स्वत:च्या नोकऱ्या गमवल्या आहेत. पण यामुळे निराश न होता स्वत:चा उद्योग सुरू करा, स्वदेशी जीवनपद्धती स्वीकारा. MNC सांस्कृतीक आणि आर्थिक गुलामी योग्य नाही. आपल्याला साम्राज्यवाद झुगारुन द्यायचा असेल तर स्वदेशी जीवन पद्धतीचा मार्ग अवलंबल्याशिवाय पर्याय नाही, असेही पुढे बोलताना बाबा रामदेव यांनी सांगितले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here