चीन-पाकिस्तानची उडाली झोप; भारतीय ‘रॉ’ने ‘अशी’ कामगिरी केल्याचा पाकचा दावा

भारताला अडचणीत आणण्यासाठी एकत्रितपणे समस्यांचा डोंगर उभ्या करणाऱ्या पाकिस्तान आणि चीनने आता भारताचा धसका घेतला आहे. होय, भारताने या दोन्ही देशांची डोकेदुखी जाम वाढवली आहे. खुद्द पाकिस्तानने याची कबुली दिली आहे.

पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीच भारताने त्यांच्या देशासह चीनची डोकेदुखी वाढवल्याचे जगाला ओरडून सांगितले आहे. कुरेशी यांनी भारतावर थेट आरोप केला आहे. की, भारतीय गुप्तहेर संस्था रॉ यांनी चीन-पाकिस्तानच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या चाइना-पाकिस्‍तान इकनॉमिक कॉरिडोरवरच थेट वेगळ्या पद्धतीचा हल्ला केला आहे.

कुरेशी यांनी आरोप केला आहे की, 80 अब्ज रुपये खर्चून भारताने सुमारे 700 दहशतवादी बलुचिस्तान भागात तयार केलेले आहेत. या आरोपात कितपत तथ्य आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, भारताने आतापर्यंत दहशतवादी कृत्यचा सातत्याने विरोध केला आहे. उलट जागतिक पातळीवर दहशतवादविरोधी देश म्हणून भारताची ओळख आहे.

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरपासून पाकिस्तान वेगळे न राहिल्यास बलुचिस्तान भागामध्ये लक्ष घालण्याचे म्हटले होते. त्यावेळी पाकिस्तानने भारताच्या विरोधात खूप रान पेटवण्याचा प्रयत्न केला होता. आताही पाकिस्तानने भारतावर असाच आरोप केला आहे.

बीएलए, बीआरए आणि तहरीक-ए-तालिबान (TTP) या संघटनांना आर्थिक आणि इतर मदत करीत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचा हा कांगावा असल्याचे दिसते. मात्र, यानिमित्ताने भारताची गुप्तहेर संस्था रॉ ही पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आलेली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here