अबबबब… दिवाळीसाठी अयोध्येत लावले ‘एवढे’ दिवे; मोडला स्वत:चाच गिनीज रेकॉर्ड

अयोध्या :

अयोध्याने रामनागरी येथे झालेल्या दिव्य दीपोत्सवात 6.07 लाख मातीचे दिवे लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पुन्हा नाव नोंदविले. यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले की, यावेळी आम्ही अयोध्येत सहा लाखाहून अधिक दिवे लावले आहेत. आता पुढच्या वर्षी 2021 च्या दीपोत्सवात अयोध्या 7.51 लाख दिवे प्रज्वलित करुन नवीन विक्रम प्रस्थापित होईल.

अयोध्या दीपोत्सवात नव्या विक्रमाची पुष्टी करताना गिनीज रेकॉर्ड टीमचे सदस्य निश्चल बरोट यांनी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की मागील वर्षीच्या सरयू नदीवरील दिवे 4,०४१२६ दिवे लावले होते, या वर्षी  6,06569 दिवे लावले आहेत, जे मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहेत. चौथा दीपोत्सव दिव्य आणि भव्य बनवण्याची जबाबदारी अवध विद्यापीठ, फैजाबाद यांच्यावर होती.

अवध विद्यापीठ दीपोत्सवचे नोडल अधिकारी परेश पांडे म्हणाले की, नवीन रेकॉर्ड मिळविण्यासाठी आम्ही साकेत कॉलेज, अवध विद्यापीठाचे 8,000 हून अधिक स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे सदस्य तैनात केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दीपोत्सवाचा नवा विक्रम नोंदवल्याबद्दल राम भक्तांना व सर्व अयोध्यावासियांचे अभिनंदन केले.

सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले की प्रदूषणमुक्त डिजिटल दिवाळीचे आयोजन करून आम्ही एक आदर्श ठेवला आहे. पुढील वर्षी हा विक्रम मागे राहील. यातून प्रदूषणमुक्त दीपावली कशी साजरी केली जाऊ शकते हेदेखील दिसून येते. यासाठी अयोध्यावासीयांचेही अभिनंदन केले पाहिजे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here