म्हणून शाळेची बस नेहमीच असते पिवळ्या रंगाची; जाणून घ्या रंजक माहिती

आजवर जगात असा एका दृष्टी असलेला माणूस नसेल ज्याने शाळेची बस पहिली नसेल. शाळेची बस म्हटले की तुमच्यासमोर आपोआप एका पिवळ्या रंगाची बस आली असेल. आता आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की शाळेच्या या बसचा रंग पिवळाच का असतो? दुसरा कोणताही रंग शाळेच्या बसला का दिला जात नाही? या प्रश्नांचे उत्तर मिळवायचे असेल तर हा लेख संपूर्ण वाचावा लागेल की मंडळी…

बसच्या जन्माचे आणि विकासाचे काही टप्पे आहेत ते आधी जाणून घेऊयात :-

  • उत्तर अमेरिकेत १९व्या शतकात सर्वातआधी स्कूल बस वापरण्यास सुरूवात केली गेली. पण त्याकाळी बस नसल्याने घोडा गाडीचा वापर केला जात असे.
  • पुढे शाळेत २०व्या शतकाच्या सुरूवातीला गाडी म्हणून घोडा गाडीऐवजी मोटार गाड्यांचा वापर सुरू झाला होता.केशरी किंवा पिवळा रंग या गाड्यांना दिलेला असायचा. जेणेकरून या गाड्यांमध्ये वेगळ्या दिसून याव्यात.
  • १९३९ पासून उत्तर अमेरिकेत स्कूल बसेसना अधिकृतपणे पिवळा रंग देण्याची सुरूवात झाली होती. भारत, अमेरिका आणि कॅनडासहीत जगभरातील अनेक देशातील स्कूल बसेस या पिवळ्या रंगाच्याच असतात. हा रंग आता या गाड्यांची ओळख बनला आहे.

रंगाच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन घ्यावे लागेल लक्षात :-

एका संशोधनात हे स्पष्ट झाले होते की, इतर रंगांच्या तुलनेत पिवळा रंग हा लवकर दृष्टीस पडतो. तसेच इतर रंगांमध्येही व्यक्तीचे लक्ष पिवळ्या रंगावर आधी जाते. इतर रंगाच्या तुलनेत पिवळ्या रंगात १.२४ पटीने अधिक आकर्षण असते.

बस पिवळा रंग असल्याने दूरूनही स्पष्ट दिसू शकते. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची बस पावसात, रात्रीही स्पष्ट दिसते. त्यामुळे दुर्घटना होण्याचा धोकाही कमी असतो.

स्कूल बससंदर्भात न्यायालयाचे नियम :- 

1) ज्या स्कूल ची बस असेल त्या स्कूलचे नाव स्कूल वर असणे आवश्यक आहे.
2) स्कूल बस मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
3) स्कूल बस मध्ये प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे,
4) स्कूल बसची स्पीड ४० किलोमीटर प्रती तासाच्या वर जायला नको.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here