फिंगरप्रिंट्स संदर्भात ‘या’ रंजक गोष्टी घ्या जाणून; नक्कीच वाचा

  • फिंगरप्रिंटस या शब्दाची ओळख आपल्याला सीआयडी आणि ईतर गुप्तचर संस्थाच्या बाबतचे सिनेमे पाहून झाली. आज आपण फिंगरप्रिंटसबाबतची काही रंजक वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
  • १) साधारणतः वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत फिंगरप्रिंटस संपूर्ण विकसित झालेल्या नसतात व त्यामध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांचे आधार कार्ड सोळा वर्षानंतर परत तयार करून घ्यावे लागते. याचबरोबर सोरायसिस, ऍसिड अटॅक, इत्यादी कारणांमुळे फिंगरप्रिंट्स खराब होऊ शकतात.
  • २) बाळ आईच्या गर्भाशयात असतानाच फिंगरप्रिंट्स विकसित होतात. अर्थात असे असले तरी जुळ्या व तिळया मुलांच्या फिंगरप्रिंटस मात्र वेगवेगळ्या असतात.
  • ३) प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स वेगळे का असतात? हे सिद्ध करण्यात शास्त्रज्ञ अपयशी ठरले असले, तरीही हे वेगळेपण नाकारणारा एकही पुरावा आजतागायत मिळालेला नाही. जुळ्या व तिळ्या मुलांच्या फिंगरप्रिंट्सही वेगवेगळ्या असतात. आजवर एकच फिंगरप्रिंट असणाऱ्या दोन व्यक्ती सापडल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
  • ४) केवळ माणूसच नाही तर प्राण्यांमध्येही फिंगरप्रिंट्स सापडतात. चिंपांझींच्या शरीर रचनेत फिंगर रिजेज आहेत जे फिंगरप्रिंट्स तयार करतात. अर्थात माकड याप्राण्याला माणसाचा पूर्वज मानल्यास याबद्दल काही विशेष वाटणार नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘माकडाच्या प्रजाती सोडून इतर प्राण्यांमध्येही फिंगर रिजेज आढळल्या आहेत. कोआला नावाचा फक्त ५) ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या प्राण्यामध्ये फिंगरप्रिंट्स विकसित झालेले आढळले आहेत. या प्राण्यामध्ये फिंगरप्रिंट्स का विकसित झाल्या हे एक न उलगडलेलं कोडं आहे. ‘कोआला’ हा अस्वल प्रजातीमधील प्राणी आहे
  • ६) ‘डीएनए’ ही संकल्पना विकसित झाल्यावरही फिंगरप्रिंट्सचे महत्व कमी झालेले नाही. वास्तविक, अद्यापही फिंगरप्रिंट्स हाच गुन्ह्याच्या ठिकाणी मिळणार सर्वात महत्वाचा पुरावा समजला जातो.
  • ७) पूर्वी गुन्हा अन्वेषणापुरताच मर्यादित असणाऱ्या फिंगरप्रिंटस आता बायोमॅट्रिक संकल्पनेमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here