‘हॉप शूट्स’ ही आहे जगातील सर्वात महाग भाजी; किंमत वाचून हैराण व्हाल..!

तुम्ही यापूर्वी कधी बाजारात भाजी-फळे याची खरेदी केली असेल तर तुम्हाला सर्वसाधारणपणे सर्वच भाज्यांचे सीजनवाईस किती रेट असतात, हे माहिती असेल. आपण जास्तीत जास्त २०-३० रुपयांची भाजीची जुडी खरेदी करतो. मात्र हिरवी पालेभाजी सुद्धा लाखो रुपयांना विकली जाऊ शकते, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण हिरव्या पालेभाज्यांची किंमत असून असून काय असणार? एखादी गड्डी 10 रुपये वीस रुपये, चला किलोने घेतली शे- दोनशे रुपये किलो. ह्या भाज्या पौष्टिक असतात व परवडत असतात म्हणून आपण नेहमी खातो. एखादी भाजी महाग असून असून किती असेल असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल, तर त्याचे उत्तर मात्र थक्क करणारे आहे.

होय! जगातील सर्वात महाग हिरवी भाजी चक्क किलोला ८२ हजार रुपये दराने विकली जाते. हॉप शूट्स या नावाने ही भाजी ओळखली जाते. म्हणजे दोन तोळे सोने किंवा दोन किलो चांदीची किंमत या भाजीसाठी मोजावी लागते. हिचा जागतिक बाजारातील दर किलोला १ हजार युरो असा आहे. आता ही भाजी कोण खाणार अस म्हणत असाल तर आश्चर्य वाटेल की ही भाजी जगभर चवीने खाल्ली जाते.अर्थात भारतात या भाजीचे फार ग्राहक नाहीत त्यामुळे ही भाजी भारतात फक्त हिमाचल मधील लाहोल स्पिती जिल्ह्यात तिची शेती केली जाते. हिचा जागतिक बाजारातील दर किलोला १ हजार युरो असा आहे.

असे आहेत या भाजीचे फायदे :-

  • या भाजीमध्ये एंटीबायोटिक गुण पाहिले जातात.
  • हि भाजी एखाद्या जडी-बुटीचे कार्य करते,
  • दातांचे दुखणे या भाजीचे सेवन केल्याने कमी होऊ शकते.
  • टीबी सारख्या काही बिमाऱ्या या भाजीचे सेवन केल्याने कमी होऊ शकतात.
  • या भाजीचे सलाद करून आपण खाऊ शकतो.
  • सोबतच या भाजीचे लोणचे केल्या जाऊ शकते.

आपल्यासारखा एक सामान्य माणूस या भाजीला विकत घेण्यासाठी हजार वेळा विचार करेल कारण हि भाजी आपल्या बजेट च्या बाहेर आहे. तरी सुद्धा जगात असेही काही लोक आहेत जे या भाज्यांना विकत घेऊन खातात.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here