दिवाळीनंतरच्या काळातही आनंदी राहायचे असेल तर ‘या’ गोष्टी नक्कीच टाळा; वाचा अधिक

मुंबई :

कोरोनाने अनेक आपली, हक्काची जवळची माणसे आपल्यापासून कायमची लांब गेली. कोरोनाच्या या महाभयंकर संकटातून आप अद्यापही सामजिक, मानसिक आणि आर्थिकरित्या सावरलेलो नाहीत. अशातच दिवाळीचा सण आलेला आहे. भारतीयांसाठी वर्षातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी आहे. त्यामुळे आता धमाल-मज्जा-मस्ती होणारच आहे. अशातच काही राज्यांनी काळजीपोटी फटक्यावर बंदी आणलेली आहे. दिवाळीत प्रदूषण झाल्यास कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. परिणामी पुन्हा मृत्यूचे आकांडतांडव सुरु होऊ शकते, अशी भीती आहेत. पुन्हा आपल्या जवळचे कोणी आपल्यापासून गमवायचे नसेल आणि दिवाळीनंतरचा काळात तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर काही गोष्टी नक्कीच टाळायला हव्यात.

– पर्यावरण आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फटाके फोडणे, घातक आहे. प्रदूषण वाढल्यास पुन्हा कोरोनाचाही धोका आहेच म्हणून फटाके फोडणे टाळा.

– पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू वापरणे टाळा. सजावटीसाठी  निसर्गोपयोगी वस्तू वापरा. पर्यावरणाची हानी होईल, असे सर्व टाळा.

– दिवाळीत मोठ्या आवाजाचे लाऊडस्पिकर न वापरता ध्वनी प्रदूषण तुम्ही टाळू शकता.   

– रांगोळीसाठी नैसर्गिक रंग वापरा. बाजारातील केमिकल असलेले रंग वापरू नका.

– कोरोनाची साथ वाढेल, असे काहीही करू नका.     

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here