अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत; परकीय चलनाच्या गंगाजळीचा नवा रेकॉर्ड; आठवड्याभरात झाली ‘एवढी’ प्रचंड वाढ

मुंबई :

देशभरात व्यापारी संस्थांसाठी धनतेरस-दिवाळी ही सुवर्ण संधी ठरली. कोरोनाकाळात अनेक नकारात्मक गोष्टींशी झुंज घेतलेल्या लोकांना सणानिमित्त सेलिब्रेट करण्याची संधी मिळली आहे. मोठ्या संख्येने लोक बाजारासाठी बाहेर पडले होते आणि जोरदार खरेदी केली आहे. गावे आणि छोट्या-मोठ्या शहरात धनतेरसला खुप चांगला व्यापार झाल्याचे दिसून आले. या सगळ्यावरून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे दिसून आले. अशातच अजून एक चांगला संकेत अर्थव्यवस्थेसाठी मिळाला आहे.

६ नोव्हेंबरला देशाकडे ५६८.४९ अब्ज डॉलरची गंगाजळी होती. आता एकाच आठवड्यात परकीय गंगाजळीत ७.७७ अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे. दिवाळीच्या आधी परकीय चलनाच्या गंगाजळीनं नवा विक्रम रचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार परकीय चलन मालमत्तेत वाढ झाल्यानं परकीय गंगाजळीत मोठी वृद्धी झाली आहे.  परकीय चलन मालमत्ता ६.४०३ अब्ज डॉलरनं वाढून ५२४.७४२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 

६ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील सुवर्ण भंडारात १.३२८ अब्ज डॉलरची वाढ झाली. त्यामुळे सुवर्ण भंडार ३७.५८७ अब्ज डॉलरवर गेला. देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मिळालेला विशेष विड्रॉवल अधिकार ७० लाख डॉलरवरून १.४४८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत जमा असलेली गंगाजळी ४.६७६ अब्ज डॉलरवर गेली आहे, अशी माहिती पीटीआयने दिली. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here