म्हणून दागिन्यांपेक्षा सोन्या-चांदीचं नाणं खरेदी करणं अधिक फायदेशीर; गुंतवणूकीसाठी होतो मोठा लाभ

मुंबई :

आता उत्सवाचा हंगाम सुरु झाला आहे. दिवाळीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते म्हणून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. काही जन सोने खरेदी करत आहेत तर काही लोक सोन्याचे दागिने खरेदी करण्यास पसंती देत आहेत. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर तसेच कोरोनाच्या आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर लोक सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे कल देत आहेत. मात्र आता सोन्याचे दागिने खरेदी करायचे की सोन्याचे नाणे खरेदी करायचे, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. आज आम्ही आपल्याला सोन्याच्या दागिन्यांपेक्षा सोन्या-चांदीचं नाणं खरेदी करणं अधिक फायदेशीर कसे ठरते आणि  गुंतवणूकीसाठी त्याचा कसा लाभ होतो, याविषयी सांगणार आहोत.

सर्वसाधारणपणे आपण सोन्याचे दागिने करायचे ठरवल्यास त्यावर मेकिंग चार्ज द्यावा लागतो. मात्र जेव्हा आपण हे दागिने मोडण्यासाठी किंवा विक्रीसाठी देतो तेव्हा मात्र मेकिंग चार्जची अमाउंट परत मिळत नाही. म्हणून जर गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असाल तर नाणे खरेदी करणे फायदेशीर ठरते.

जर सोन्याच्या नाण्यापासून कोणतेही दागिने बनवायचे असतील तर मेकिंग चार्जवेळी केवळ सोन्याची किंमत मिळेल. जर तुमच्याकडे शिक्का असेल, तर कोणत्याही नुकसानाशिवाय तुम्ही दागिने बनवू शकता. विशेष म्हणजे सोन्याचे नाणे खरेदी केले असेल आणि भविष्यात सोन्याच्या किंमती वाढल्या तर ते नाणे विकताना नुकसान तर होतच नाही वरून जास्तीची किंमतही भेटते. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here