धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या दरात थोडीशी वाढ; वाचा, काय आहेत दर

दिल्ली :

आता उत्सवाचा हंगाम सुरु झाला आहे. तसेच दिवाळीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते म्हणून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. दिवाळी आणि धनतेरसच्या निमित्ताने वाढलेल्या मागणीमुळे दिल्ली सराफ मार्केटमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती वाढल्या आणि सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅम 241 रुपयांनी वाढून 50,425 रुपये झाले. गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 50,184 रुपयांवर बंद झाले.

त्याचप्रमाणे चांदीचा दरही 161 रुपयांनी वाढून 62,542 रुपये प्रतिकिलोवर आला. मागील व्यापार सत्रात चांदीचा दर 62,381 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, “कोविड लस येण्यास विलंबाची लागू शकतो, असे लोकांना वाटत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीतील मजबुती दिसून आली.

ते म्हणाले की बाजारामध्ये खूप भीती आहे. कारण असे आहे की अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात कोरोनाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. यामुळे मौल्यवान धातूंची खरेदी आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढला आहे.         

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here