पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; ११ पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान; ‘एवढे’ झाले जखमी

मुंबई :

कुरापतखोर पाकिस्तानने ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना नियंत्रण रेषा भागात गोळीबार केला. ऐन दिवाळीत त्यांनी कराराला कचऱ्याची टोपली दाखवल शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.  नियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. पाक सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून आतापर्यंतच्या कारवाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 11 सैनिकांना कंठस्नान घातलं आहे. 12 सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानने आज पुन्हा रडका डाव खेळत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. नेहमीप्रमाणे भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानच्या या रड्या डावाला भारताच्या शुरांनी चोख उत्तर दिले. पाकिस्तानच्या सैन्याकडून उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी तुफान गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये 4 सुरक्षा दलातील जवानांसह 10 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय सैन्याकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला. ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिकांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याच दरम्यान पाकिस्तानी सैनिकांना सडेतोड उत्तर देताना काही जवानही यामध्ये जखमी झाले आहेत.

भारताच्या हद्दीत घुसखोरी करून रक्तपात करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यासाठीच पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्र्ासंधीचे उल्लंघन सुरू आहे. मात्र, पाकडय़ांचा हा डाव उधळून टाकण्यासाठी हिंदुस्थानचे जवान सज्ज आहेत. सीमेवर गस्ती वाढविण्यात आल्या असून, हायअलर्ट जारी केला आहे. सीमेलगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे भारतीय सैन्यातील जवान शहीद झाले आहेत. तर त्याच सोबत पाकिस्तानशी लढताना सब इन्स्पेक्टर राकेश डोवाल यांना वीरमरण आलं आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here