रिलायन्सला जिओला झटका; ‘त्या’ बाबतीत आयडिया, वोडाफोन सर्वात पुढे, वाचा काय आहे विषय

मुंबई :

सगळ्याच गोष्टी पुढे असण्याचा अट्टहास बाळगणाऱ्या रिलायन्स समूहाला झटका बसला आहे. रिलायन्स जिओनेही आजवर कायम मोठमोठे धमाके करत इतरांना झटके दिले आहेत. मात्र यावेळी चक्क रिलायन्स जिओलाच झटका बसल्याचे समोर आले आहे. रिलायन्स जिओने ऑक्टोबरमध्ये डाउनलोड स्पीड कमी झाल्याची नोंद केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Trai)च्या आकडेवारीवरून हे उघड झाले आहे. गुरुवारी ट्रायने आपल्या मायस्पीड पोर्टलवर ही नवीन आकडेवारी जाहीर केली. रिलायन्स जिओने ऑक्टोबरमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 17.8 एमबीपीएस नोंदविला.

मागील महिन्यात, देशातील सर्वात मोठ्या वायरलेस ऑपरेटरने डाउनलोड स्पीड 19.3 एमबीपीएस नोंदविली. जिओचा डाउनलोड वेग कमी असला तरीही कंपनीने देशातील सर्वात वेगवान वायरलेस ऑपरेटरचे स्थान कायम ठेवले आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार, आयडियाने ऑक्टोबरमध्ये 9.1 एमबीपीएस स्पीडने भारतातील दुसऱ्या वेगवान वायरलेस ऑपरेटरचे स्थान मिळविले. यापूर्वी आयडियाने सरासरी डाउनलोड स्पीड 8.6 एमबीपीएस नोंदविला होता. याव्यतिरिक्त व्होडाफोनने ऑक्टोबरमध्ये 8.8 एमबीपीएसचा सरासरी स्पीड नोंदविला, डाउनलोड स्पीड सुधारला. सप्टेंबरमध्ये हा स्पीड 7.9 एमबीपीएस होती. दरम्यान, भारती एअरटेलने ट्राई चार्जच्या तळाशी स्थान ठेवले असून ऑक्टोबरमध्ये कंपनीची सरासरी स्पीड 7.5 एमबीपीएस होती. यापूर्वी एअरटेलने सप्टेंबरमध्ये 7.5 एमबीपीएस स्पीड नोंदविला होता.

ट्राय डेटावरून असे दिसते की भारतात अपलोड स्पीडच्या बाबतीत व्होडाफोनने प्रथम क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे. व्होडाफोनने ऑक्टोबरमध्ये 6.5 एमबीपीएसची सरासरी अपलोड स्पीड नोंदविला.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये एअरटेलने 3.8 एमपीबीएस अपलोड स्पीड  नोंदविला आणि तिसर्‍या क्रमांकावर राहिला. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ट्रायच्या आकडेवारीनुसार एअरटेल 3.5.M एमबीपीएस स्पीडने दुसर्‍या स्थानावर होता. रिलायन्स जिओने ऑक्टोबरमध्ये 3.5 एमपीबीएसची वेगवान अपलोड स्पीड नोंदविला. मागील महिन्यात कंपनीच्या अपलोडची गती समान होती.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here