सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: १२ वी पास असणाऱ्यांनी करा अर्ज; उद्या अर्जाची शेवटची तारीख

मुंबई :

अशा आर्थिक संकटाच्या काळात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणे म्हणजे सुवर्णसंधी आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना केंद्र सरकारच्या विभागांत नोकरीची ही सर्वात मोठी संधी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) संयुक्त उच्च माध्यमिक स्तरीय परीक्षा 2020 (CHSL) साठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरही सुरू झाली आहे.

या पदांवर होणार भरती :-

या परीक्षांच्या माध्यमातून भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये या पदांसाठी भरती आहे.

लोअर डिवीजन क्लर्क (LDC)

जूनियर सेक्रेटेरियट असिस्टेंट

पोस्टल असिस्टेंट

सॉर्टिंग असिस्टेंट

डाटा एंट्री ऑपरेटर्स

देशातील कोणत्याही बोर्डमधून १२ वी उत्तीर्ण झालेले तरुण या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज फी: – महिला उमेदवार, दिव्यांग, एससी, एसटी आणि माजी कर्मचार्‍यांसाठी अर्ज विनामूल्य आहे. इतर उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल. या पदांसाठी 18 वर्षापासून ते 27 वर्षांपर्यंतचे तरुण पात्र आहेत. आरक्षित वर्गांना जास्तीत जास्त वयोमर्यादा (27 वर्षे) पर्यंत 15 वर्षांपर्यंतची सवलत मिळेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख – 6 नोव्हेंबर 2020.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 पर्यंत)

ऑनलाईन फी भरण्यासाठी शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 पर्यंत)

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here