अबबब… बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा नफा आर्थिक वर्षात ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढला; महसूलही वाढला

दिल्ली :

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये हरिद्वारस्थित पतंजली आयुर्वेद लिमिटेडचा निव्वळ नफा 21.56 टक्क्यांनी वाढून 424.72  कोटी झाला आहे. व्यवसाय माहिती प्लॅटफॉर्म टॉफलरने ही माहिती दिली. टॉफलरच्या म्हणण्यानुसार कंपनीने मागील आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 349.37 कोटी रुपयांचा फक्त नफा नोंदविला होता.

टॉफलरने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने फायनान्सियल टाईम्सने पुढे म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेदचा 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 9,022.71 कोटी रुपयांचा महसूल होता, जो मागील आर्थिक वर्षातील 8,522.68 कोटींपेक्षा 5.86 टक्के जास्त होता.

आर्थिक वर्ष 2019-20  मध्ये कंपनीचा एकूण महसूल 9,087.91  कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षात 8,541.57 कोटी होता. अहवालाच्या काळात पतंजली आयुर्वेदचा एकूण खर्च 5.34 टक्क्यांनी वाढून 8,521.44 कोटी रुपये झाला. योगगुरू रामदेव यांनी प्रमोट केलेल्या या संस्थेच्या कर पूर्व नफा 2019-20 या आर्थिक वर्षात 25.12 टक्के वाढून तो 566.47 कोटी रुपये झाला. आकडेवारीनुसार, मागील वर्षात ही रक्कम 452.72 कोटी होती. आर्थिक वर्षात दुसर्‍या उत्पन्नाचा महसूल तीन पटीने वाढून 65.19 कोटी होईल. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये ते 18.89 रुपये होते.

या विषयावर बोलताना स्वामी रामदेव म्हणाले की, मागील आर्थिक वर्ष त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होत।  आर्थिक आव्हाने असूनही त्यांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय काम केले आहे. कंपनीच्या भविष्यातील संभाव्यतेबद्दल ते म्हणाले की चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या व्यवसायात अभूतपूर्व वाढ होईल, कारण पतंजलीच्या उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वासनिय आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे प्रोडक्ट असणे हे ग्राहकांसाठी विश्वासार्ह आहे. दिव्य फार्मसी, जे आयुर्वेदिक मैन्युफैक्चरिंग यूनिट आहे, यासारख्या विभागाची प्रगती अधिक होईल, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here