आता थेट Whatsappवर मिळणार कृषी योजनांची माहिती; वाचा, काय आहे कृषिमंत्र्यांची भूमिका

मुंबई :

महाविकास आघाडी सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन सुविधा आणत असते. आताही सरकारने एक जबरदस्त निर्णय घेतला असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्याला होणार आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती (Agricultural schemes) तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हॉटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे.

मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्ॲपचा वापर करण्यात येत आहे.राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेवून कृषी विस्तार कार्यामध्ये ह्या बाबींचा फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हॉटसॲपव्दारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची  सुविधा तयार करण्यात आली आहे.

अशी मिळवा माहिती :-

मोबाईलवरून ८०१०५५०८७० या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’  शब्द टाईप करून पाठविणाऱ्या व्यक्तीस स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस् ) दिले आहेत. ते टाईप करून या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते.

संपादन : स्वप्नील पवार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here