छोटे व्यापारी आणि इतर दुकानदारांसाठी Paytmने आणली ‘ही’ आर्थिक सुविधा, वाचा कसा होईल फायदा

मुंबई :

सध्या अनेक डिजिटल वालेट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म दिवाळीसाठी कर्ज देऊ करत आहे. मात्र पेटीएम आधीपासूनच आपल्या ग्राहकांना कर्ज देते आहे. तेही कुठलीही जास्त कागदपत्रे आणि ईतर झंजट न करता.  गेल्या आर्थिक वर्षात पेटीएमने एकूण 550 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. पेटीएम कर्जाचा फायदा सुमारे 1 लाख व्यापाऱ्यांना झाला आहे.

आता छोटे व्यापारी आणि इतर दुकानदारांसाठी पेटीएमने एक मोठी सुविधा आणली आहे. पेटीएम आता मोठ्या प्रमाणावर कर्ज देणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज ग्राहकांना अगदी सहज सुलभ पद्धतीने उपलब्ध होणार आहे. पेटीएम 5,00,000 रुपयांपर्यंतच्या व्याजदराद्वारे कर्ज देण्याची तयारी करत आहे. छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेटीएम दररोज EMI जमा करणारे प्रोडक्टस तयार करत आहे. पेटीएम बिझिनेस अ‍ॅपमध्ये कंपनी ‘Merchant Lending Program’ सेक्शन अंतर्गत कोलॅटरल फ्री लोन करते.

अशा प्रकारे मिळते कर्ज :-

त्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या आधारे प्लॅटफॉर्मच्या क्रेडिट क्षमतेचे प्लॅटफॉर्म अल्गोरिदम द्वारे मूल्यांकन केले जाते. यानंतर, प्री-क्वॉलिफाइड लोनची रक्कम दिली जाते.

अशी आहे कर्ज प्रक्रिया :-

पेटीएमद्वारे कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे. यात कर्जासाठी अर्ज करण्याची आणि मंजूर कर्ज देण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे. एनबीएफसी आणि बँकांच्या पार्टनरशिप नंतर कर्ज अर्जदारास कोणतीही अतिरिक्त डॉक्युमेंट देण्याची गरज नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here