Googleवर डेटा सेव्ह करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे; वाचा काय आहे विषय

मुंबई :

आजवर गुगल आपल्याला फोटो किंवा व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी कुठलाही पैसे आकारत नव्हते, मात्र आता आपल्याला गुगलवर डेटा सेव्ह करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 1 जून 2021 पासून गुगल फोटो अपवर 15 GBपेक्षा अधिक डेटा अपलोड करायचा असल्यास तुम्हाला पैसा मोजावे लागणार आहेत. या प्रकारची पॉलिसी गुगलने GMail आणि गूगल ड्राइव्हसाठी आधीच लागू केली आहे.

1 जून 2021 पासून तुम्ही ‘गुगल फोटो’वर 15 GB पेक्षा अधिक डेटा अपलोड केल्यास पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर 1 जून 2021 आधी युजर्सनी कितीही डेटा अपलोड केला तर त्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत, अशी माहिती गुगलने दिली आहे.

कसे व किती आकारले जाणार पैसे :-

या नवीन पॉलिसीनुसार 15 GB पर्यंत डेटा तुम्ही मोफत सेव्ह करू शकता. जर ग्राहकांनी ही 15 GBची मर्यादा ओलांडली तर त्यांना कमीतकमी 100 GB पर्यंत स्टोरेज घ्यावे लागेल. यासाठी प्रतिमहिना 130 रुपये आणि वर्षाला 1300 रुपये चार्ज आकारला जाईल. 200 GBपर्यंत स्टोरेज घेतल्यास महिन्याला 210 रुपये चार्ज द्यावा लागेल. तर 2TB आणि 10TB स्टोरेजसाठी महिन्याला अनुक्रमे 650 रुपये आणि 3,250 रुपये द्यावे लागतील.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here