मुकेश अंबानींनी घेतला ‘तिथे’ गुंतवणुकीचा निर्णय; देशातील शेतकऱ्यांसाठी ठरणार हिताचा

मुंबई :

भारतातील आघाडीच्या रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानींनी क्लीन एनर्जीच्या बेकथ्रू एनर्जी वेंचर्स लिमिटेड कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी या कंपनीत 5 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 375 कोटी रुपये गुंतवणार आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांच्या क्लीन एनर्जीच्या बेकथ्रू एनर्जी वेंचर्स लिमिटेड कंपनीत आजवर जगातल्या अनेक मोठ्या उद्योजकांनी पैसे गुंतवले आहेत. उद्योगपती जेफ बेजोस, मायकल ब्लूमबर्ग, जॅकमा, मासायोशी सोन यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे.

मुकेश अंबानी यांच्या या प्रयोगाचा फायदा संपूर्ण देशाला होईलच त्याबरोबर गुंतवणुकदारांनाही होईल. या प्रकल्पात गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या गुंतवणुकीसाठी अद्याप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी देण्यात आलेली नाही. ही गुंतवणूक रिलेटेड पार्टी ट्रान्जेक्शन अंतर्गत होत नाही. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्टीज लिमिटेडच्या कुठल्याही प्रमोटर, प्रमोटर ग्रुप किंवा ग्रुप कंपनीचे कोणतेही हीत नाही, अशी माहिती रिलायन्स समूहाकडून दिली आहे.

नेमकं काय करते ही कंपनी :-

ऊर्जा आणि कृषी तंत्रज्ञानाच्या विकासात गुंतवणूक करुन हवामान संकटावर उपाय शोधण्यासाठी काम करते. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती पुरवते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, हा या कंपनीचा मुख्य उद्देश आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here