म्हणून पवारांच्या बारामतीत नगरपालिकेवर फडकवले काळे झेंडे; वाचा, काय आहे प्रकरण

बारामती :

देशाचे जेष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरच्या बालेकिल्ल्यातच नगरपालिकेवर काळे झेंडे फडकवल्याची घटना समोर आली आहे. सध्या देशभरातील कामगार विविध समस्यांमुळे आंदोलन करताना दिसत आहेत. अशातच बारामती नगरपालिकेतील कर्मचारी आंदोलकांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. बोनस मिळावा म्हणून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारलं असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

विशेष म्हणजे या विषयावरून कामगारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काल निवेदन दिले आहे. मात्र दिवाळी उद्यावर आली असूनही अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. म्हणून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. तरीही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांपैकी कोणीही आंदोलकांना भेटण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी इमारतीवर चढून काळे झेंडे फडकवून घोषणाबाजी केली. या आंदोलनाचा शहरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असेही कामगारांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांनी केली ही मागणी :-

सानुग्रह अनुदानाबाबत काही नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली मात्र तरी देखील तोडगा निघालेला नाही. अनुदान देण्याबाबत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. मात्र, याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे. प्रशासनानं यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here