शाळेविषयीची ही कविता नक्कीच वाचा; बालपणीच्या आठवणी होतील ताज्या…

अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं |

मन पुन्हा तरूण होऊनबाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामध्ये घुमतो |

गोल करून डबा खायलामग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनीगच्च भरलेली माझी वही |

अपूर्णचा शेरा आणिबाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुकाआणि हातांवरले व्रण |

वहीत घट्ट मिटून घेतलेतआयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंचबाई आता रोज जगतो |

चुकलोच कधी तर तुमच्यासारखंस्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याचीतुम्ही इतकी वाढ केली आहे |

हमखास हातचा चुकण्याची सुद्धासवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवायमाझा हात लिहू देत नाही |

एका ओळीत सातवा शब्दआता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचासमास तेवढा सोडतो आहे |

फळ्यावरच्या सुविचारासारखीरोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारूनप्रत्येक मर्यादा ठरवलेली |

हळव्या क्षणांची काही पानंठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |फक्त एकदा पाहून जा |

दहा पैकी दहा मार्कआणि सही तेवढी देऊन जा ||

कविता स्रोत : फेसबुक – माझी कविता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here