हे प्रेरणादायी विचार देतील तुम्हाला विचार करण्याचा नवा दृष्टीकोन; नक्कीच वाचा

१) मनात नेहमी जिंकण्याची अशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो… पण वेळ नक्कीच बदलते. 

२) चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते.

३) कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खुप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. 

४) फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. 

५) निराशावादी प्रत्येक संधी मध्ये अडचण पाहतो तर आशावादी प्रत्येक अडचणी मध्ये संधी पाहतो. 

६)  यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.

७) जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे. ज्या गोष्टीला “लोक” म्हणतात कि हे तुला कधीच जमणार नाही. 

८) आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल…
मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल…..! 

९) आवाज हा नेहमी चिल्लरचाच होतो नोटांचा नाही. म्हणून तुमची किंमत वाढली कि शांत रहा. 

१०)  “होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला
सिहांच काळीज लागतं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here