तब्बल चौथ्यांदा निवडून आलेल्या ‘या’ आमदाराकडे नाहीये स्वतःचं पक्क घर; वाचा, व्हायरल आमदाराची जबरदस्त गोष्ट

बलरामपुर :

बिहार विधानसभा निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनंतर पार पडली. अखेरीस तेजस्वी यादव यांची राजद पक्ष हा बिहारमधील सर्वात मोठा ठरला तर संयुक्त जनता दलाने गेल्या १५ वर्षात सर्वात खराब कामगिरी करूनही त्यांचा मुख्यमंत्री आहे. असे असले तरी सध्या सोशल मिडीयाचा हिरो एक आमदार आहे, जे चौथ्यांदा निवडून आलेले आहेत.

कटिहार जिल्ह्यातील बलरामपूर येथील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी-लेनिनिस्ट (सीपीआय एमएल) चे आमदार महबूब आलम हे सध्या चर्चेत आहेत. ते जिंकून आले म्हणून ते चर्चेत नाहीतर ते एका दुसऱ्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या सध्या राहणीमानासाठी सध्या ते चर्चेत आहेत.

जर एखादा नेता चार वेळा आमदार असेल तर साहजिकपणे आपल्या मनात नक्कीच असे येईल की, तो अत्यंत मोठ्या बंगल्यात राहत असेल. अत्यंत ऐशोआरामी जीवन जगत असेल. त्याच्याकडे बरीच वाहने असतील, दिमतीला अनेक नोकरचाकर असतील. पण तुम्ही जर बिहारमध्ये चौथ्यांदा निवडून आलेल्या एका आमदारांच्या घरी जाल तर हे सर्व भ्रम ठरतील.   

मेहबूब हे अजूनही कच्च्या घरात राहतात. या घराबद्दल बोलताना त्यांनी अनेक वेळा सांगितले की, मी जनतेची सेवा करण्यासाठी आमदार बनलो आहे. त्यांची सेवा माझे प्राधान्य आहे. माझ्या सध्या राहण्याचे मला कौतुक नाही, आणि मी त्याचा प्रचारही करत नाही.

सार्वजनिक सेवेला आपले प्राधान्य देणारा पती मिळाल्याचा मला आनंद आहे असे त्यांच्या पत्नीने म्हटले आहे. आज जेव्हा राजकारणाचा अर्थ ग्लॅमर म्हणून घेतला जातो, किलोभर सोनं, २-३ कार्यकर्ते, ब्रांडेड वस्तू आणि मोठ्या ब्रांडची गाडी अशा पद्धतीने राजकीय नेत्यांचे चित्र आपल्यासमोर असते. अशा काळात मेहबूब आलम सारखे ४-४ वेळा निवडून येणारे आमदार खरोखर आपल्यासाठी खरोखर प्रेरणा आहेत. यासोबत विशेष कौतुक आहे ते त्या मतदार संघातील जनतेचे… कारण तेथील जनतासुद्धा सुज्ञ आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here