विद्यार्थ्यांचे हे मराठी जोक्स वाचा आणि पोटभर हसा; हसा चकटफू

1)  एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो:

“भावा हे engineering काँलेज कस आहे ?

पाणी पुरीवाला: “एकदम जबरदस्त आहे
मी पण engineering इथेच केलेली आहे ! 

2) जितकी पाकिस्तानची लोकसंख्या आहे…

तितक्या लेकरांना तर भारतात engineering ला Drop बसतो.

3) एक Engineer बॅटिंग करत होता….

त्याचे ४० रन्स पूर्ण झाले की त्यांनी बॅट वरकरून अभिवादन केले…
दूसरा बॅट्समन जवळ आला आणि म्हणाला,
“अरे वेड्या. फक्त ४० रन्स झाले आहेत.. ५० किंवा १०० नाही”
त्यावर इंजिनीअर म्हणाला. तू गप रे ८वी फेल…..

४०ची किंमत फक्त इंजीनिअरच समजू शकतो.

4) कॉलेज मधील २ बेस्ट दिवस
.
.
.
.
पहिला आणि शेवटचा.

5) परीक्षेला १५ मार्कांसाठी आलेला प्रश्न…

मुंग्यांना कसे माराल ?
उत्तर: पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या
हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर… जातील
आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर
त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..

तात्पर्य: १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील

६) दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:

पहिला: अरे यार ! आज कोणता पेपर होता ?…

दुसरा: गणिता

पहिला: म्हणजे तू पेपर लिहिलास ?….

दुसरा: नाही रे!
बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला.. 

७) परिक्षा चालू होती

पेपर फार कठीण …..काय लिहावे सोम्याला काहीचं येत नव्हते
मग त्याने एक शक्कल लढवली जितके आले तितके ढापून ढूपून लिहीले
खिशातून शंभर रुपयाची एक नोट काढली आणि पेपर ला लावली खाली लिहीले

” एका मार्कासाठी एक रुपया “
.
.
.
रिझल्ट आला ……त्याच्या रिझल्ट ला ऐंशी रु जोडलेले होते खाली लिहीले होते

“You got 20 marks”

८) वडील: तुला परीक्षेत ९५% पाहिजे बरा का!

मुलगा: फक्त ९५% ? १०५% मिळवीन!

वडील: का रे थट्टा करतोस का?

मुलगा: पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना!

९) हे साले नातेवाईक् वाढदिवसच्या दिवशी शुभेच्या द्यायला कधी फोन करत नाहीत..

पण
.
.
.
.
रिजल्ट च्या दिवशी बरोबर किती मार्क्स पडले विचारायला फोन करणार
आणि मार्क्स कमी पडले तर दिड तास फोन वर lecture देणार…

१०) एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण.

परीक्षा..

दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि घरचे आरती पण ओवाळतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here