अन्यथा मेल, फोटो, व्हिडिओ होतील डिलीट; गुगल वापरणाऱ्यांनो इकडे द्या लक्ष

दिल्ली :

गुगल आता आपल्या अनेक सुविधा आणि त्यावरील शुल्क यासंबंधीच्या पॉलिसी बदलणार आहे. आजवर गुगल आपल्याला फोटो किंवा व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी कुठलाही पैसे आकारत नव्हते, मात्र आता आपल्याला गुगलवर डेटा सेव्ह करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 1 जून 2021 पासून गुगल फोटो अपवर 15 GBपेक्षा अधिक डेटा अपलोड करायचा असल्यास तुम्हाला पैसा मोजावे लागणार आहेत. तसेच ज्या युझर्सचं अकाऊंट गेल्या 2 वर्षांपासून वापरात नाही, ते अकाऊंट आपोआप डिलीट होणार आहे. अकाऊंट डिलीट होणार म्हटल्यावर तुमचे मेल्स, फोटो, व्हिडीओ, ड्राईव्ह सगळंच डिलीट होणार आहे.

येत्या 1 जूनपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून इनअॅक्टिव्ह असलेली अकाउंट डिलिट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. ज्या ग्राहकांचे अकाउंट गेल्या दोन वर्षांपासून वापरात नाहीत. त्यांचे जीमेल आणि ड्राइव्ह डिलीट होणार असल्याने ग्राहकांचे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाचे मेसेजही डिलीट होणार आहेत. तसंच जे जीमेल ड्राईव्हवर स्टोअरेज कॅपसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत त्या युझर्ससाठीही हे नवं धोरण लागू होणार आहे.

या नवीन पॉलिसीनुसार 15 GB पर्यंत डेटा तुम्ही मोफत सेव्ह करू शकता. जर ग्राहकांनी ही 15 GBची मर्यादा ओलांडली तर त्यांना कमीतकमी 100 GB पर्यंत स्टोरेज घ्यावे लागेल. यासाठी प्रतिमहिना 130 रुपये आणि वर्षाला 1300 रुपये चार्ज आकारला जाईल. 200 GBपर्यंत स्टोरेज घेतल्यास महिन्याला 210 रुपये चार्ज द्यावा लागेल. तर 2TB आणि 10TB स्टोरेजसाठी महिन्याला अनुक्रमे 650 रुपये आणि 3,250 रुपये द्यावे लागतील.

असा आहे गुगलचा नवा नियम :-

तुमच्या अकाऊंटमध्ये स्टोअरेज लिमीट जास्त असेल तुमचे व्हिडीओ, फोटो, मेल्स आणि इतर डेटा गुगल आपोआप डिलीट करू शकतो. पण त्या आधी युझर्सना तशी सूचना दिली जाणार आहे. युझर्सना त्यांचं अकाऊंट सक्रिय ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी सोपा उपाय आहे. अधेमधे तुमचं वापर नसलेलं अकाऊंटही ओपन करुन बघत जा. नको असलेला डेटा स्वत:च डिलीट करा. यामुळे तुमचं अकाऊंटही वापरामध्ये येईल आणि डेटा डिलीट केल्यामुळे तुमची स्टोअरेज लिमीट वाढणार नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here