म्हणून देशात ट्विटरवर बंदी येण्याची आहे शक्यता; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई :

लेह लडाखमध्ये दाखवण्याऐवजी ट्विटरने जम्मू-काश्मीरचा भाग म्हणून दाखवले आहे. नकाशात घोळ घाळणाऱ्या ट्विटरला केंद्र सरकारने पुन्हा दट्ट्या दिला आहे. या प्रकरणी केंद्र सरकराने ट्विटरला नोटीस बजावली असून ट्विटरकडून स्पष्टीकरणही मागितले आहे. दरम्यान या प्रकरणावरून येत्या काळात देशात ट्विटरवर बंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक प्रभातने एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ट्विटर इंडियाच्या विरोधात एफआयआरदेखील दाखल केली जाऊ शकते. लोकप्रिय समाज मध्यम कंपनी ट्विटरला भारतात निलंबित अथवा ब्लॉक केले जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ट्विटरने हे काम भारतीय सार्वभौम संसदेच्या इच्छाशक्तीचे उल्लंघन करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला आहे, अशा पद्धतीने या प्रकरणाकडे पहिले जात आहे.

यापूर्वी ट्वीटरने घातलेला घोळ :-

  • गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संसदेने लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. सरकारने सोमवारी ट्विटरला नोटीस जारी करत ५ दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे.
  • यापूर्वी जेव्हा लेह हा चीनचा प्रदेश असल्याचे दाखवण्यात आले होते तेव्हा ट्विटरचे संस्थापन जॅक डॉर्सी यांना नोटीस पाठण्यात आली आहे.

कशा प्रकारे होणार कारवाई :-

‘भारताच्या नकाशाबाबत छे़डछाड करण्यासाठी भारतात आम्ही ट्विटरच्या प्रमुखांविरोधात फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम १९६१ अंतर्गत एफआयआर दाखल करू शकतो. या अंतर्गत सहा महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा आहे. तसंच याव्यतिरिक्त सरकार माहिती तंत्रज्ञान कायद्याचाही मार्ग अवलंबू शकतो. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६९ ए अंतर्गत कंपनीला ब्लॉक केले जाऊ शकते,’, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here