हिवाळ्यात शेळ्यांना होतात ‘हे’ आजार; वाचा, काळजी घेण्याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती

हिवाळ्यात कडक थंडी पडलेली असते. या थंडीत माणसांसारखेच आजार जनावरांनाही उद्भवतात. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी आणि कशाप्रकारे घ्यावी, हे माहिती नसल्यास जनावरे दगव्ण्याचीही शक्यता असते. आपला शेळ्यांचा गोठा किंवा मेंढ्यांचा कळप असल्याने    

शेळ्या मेंढ्या एकत्र असतात. अशावेळी संसर्गजन्य आजार झाल्यास पशु दगावण्याची शक्यता असल्याने आर्थिक नुकसानाचा फटकाही बसू शकतो. त्यामुळे शेळीपालन-मेंढीपालन करताना व्यावसायिकांनी आजार आणि त्यावरील उपाय याविषयी जागरूक असले पाहिजे.  हिवाळ्यामध्ये शेळ्या-मेंढ्यांना प्रामुख्याने आंत्र विषरक्तता, संसर्गजन्य, न्युमोनिया , मवा  फुट रॉट , इनफेकशस केऱ्याटायटीस असे विविध प्रकारचे आजार होतात. आता आज आपण हे सर्व आजार का होतात, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर काळजी कशी घ्यायची हे जाणून घेणार आहोत. कुठल्याही आजारावर उपचार करताना लक्षणे आधी लक्षात घेतली जातात म्हणून लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

१) आंत्र विषरक्तता :-

  • लक्षणे :-
  • शेळीची सातत्याने होणारी उठबस (नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात)
  • शेळीचे पोट दुखणे
  • शेळीला हगवण लागणे

अचानक खाण्यात होणा-या बदलामुळे किंवा तणावामुळे आंत्र विषरक्तता हा रोग होऊ शकतो. या रोगाची लक्षणे लवकर लक्षात न आल्यास आणि तीव्रता जास्त असल्यास करडे दगावण्याची शक्यता जास्त असते. विशेष म्हणजे प्रौढ शेळ्यांना रोगबाधेचे लसीकरण झाले असले तरी हा रोग होऊ शकतो.

काही शेळ्यांना हा रोग जास्त दिवस टिकतो. मग शेळ्या सतत आजारी पडतात. आजारी पडल्यामुळे वजन घटत राहते.

अशी घ्या काळजी :-

  • करडांचे लसीकरण करावे आणि बुस्टर लस योग्य वेळी द्यावी.
  • नवीन शेळ्यांचे लसीकरण करूनच त्यांना कळपात दाखल करा.
  • जर एखादी शेळी गाभण असेल तर करडांना जन्म देण्यापूर्वी  २ ते ३ आठवडे लस टोचणीची वेळ राहील. ज्यामुळे जन्मणाऱ्या करडांना रोगप्रतिकार शक्ती चांगली मिळेल.

२) मवा :-

लक्षणे :-

त्वचेवर पिटिका आणि पुटिका

हा रोग झाल्यावर आजारी कोकरांना दूध ओढता येत नाही व चारा देखील खाता येत नाही. खाता न आल्याने अशी कोकरे व शेळ्या-मेंढ्या झपाट्याने कमजोर होतात व वजनात घट होते.

हा संसर्गजन्य रोग असल्याने या आजारी शेळ्यांना त्वरित कळपाबाहेर दाखल करा.

३) संसर्गजन्य न्यूमोनिया :-

सदर रोग जनावरांना कुठल्याही ऋतुत होऊ शकतो. असे असले तरी हिवाळ्यात याचे प्रमाण वाढलेले दिसते.

लक्षणे :-

शारीरिक तापमानात वाढ

श्वास घेण्यास त्रास

वजन घटने, खोकला.

हा आजार शेळ्या-मेंढ्यांना झाल्यास आजारी जनावरांना कळपातून वेगळे करावे व तज्ज्ञपशुवैद्यकाकडून औषधोपचार करून घ्यावा.

४) इन्फेक्शस केरेंटायटीस या रोगात जनावरांच्या डोळ्यावर थेट परिणाम होतो. जनावरे डोळे बंद करू लागतात. काहीवेळा अंधत्व येते. परंतू २ ते ३ आठवड्यात पुन्हा दृष्टी मिळते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here