‘त्यावरून’ शिवसेनेचा किरीट सोमय्यांना दिला इशारा; शेठजी, जरा जपून!

मुंबई :

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सध्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान ठाकरे कुटुंबावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने आरोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जाहीर इशारा सोमय्या यांना दिला आहे.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असे म्हणत खुले आव्हानच सोमय्या यांना दिले आहे.

‘अन्वय नाईक यांच्यासोबत २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी औलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र’, असे ट्वीट करत राऊत यांनी शिवसेना स्टाईल इशारा सोमय्यांना दिला आहे.

नेमकं काय म्हणाले होते सोमय्या :-

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?

‘ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत, असे म्हणत त्यांनी ही कागदपत्रेही ट्वीटरच्या माध्यमातून लोकांसमोर आणली होती.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here