बराक ओबामांच्या आत्मचरित्रात उल्लेख; राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण…

दिल्ली :

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात भाष्य केले आहे. ‘राहुल गांधी यांना काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते’, असे ओबामा यांनी म्हटले आहे.   

बराक ओबामा यांनी आपल्या नव्या पुस्तकात (आत्मचरित्र) ‘ए प्रॉमिसिड लँड’ यात विविध देशांच्या नेत्यांशी भेट घेतल्यावर आपले मत स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला आहे. 

नेमकं काय म्हणाले ओबामा राहुल गांधींविषयी :-

राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, त्यांच्यात एक प्रकारची खोल निष्ठा आहे.  ‘निर्विकार प्रामाणिकपणा असलेली व्यक्ती’ असे केले आहे. 

बराक ओबामा यांचे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक जीवनापेक्षा त्यांच्या राजकीय भूमिकेवर अधिक केंद्रित आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी राजकारणाच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ओसामा बिन लादेनच्या हत्येपर्यंत अनेक मुद्द्यांविषयी लिहिले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here