इन्फोसिसचे सहसंस्थापक शिबुलाल यांना गिफ्टमध्ये मिळाले 4 लाख शेअर्स; वाचा काय आहे विषय

दिल्ली :

इन्फोसिसचे सहसंस्थापक एसडी शिबुलाल यांना गिफ्टमध्ये चार लाखाहून अधिक शेअर्स मिळाले आहेत. ही भेट मिळाल्यानंतर कंपनीतील एकूण शेअर्सची संख्या 21.6 लाख होईल. रेगुलेटरी फाइलिंगकडून ही माहिती प्राप्त झाली आहे. इन्फोसिसने शुक्रवारी शेअर बाजाराला सांगितले की शिबूलाल यांना 12 नोव्हेंबरला भेट म्हणून 4,01,000 शेअर्स देण्यात आले. तथापि, शेअर्स कोणी भेट म्हणून दिली हे सांगण्यात आले नाही.

दुसर्‍या रेगुलेटरी फाइलिंगमध्ये शिबूलाल यांची पत्नी कुमारी यांनी 4.01 लाख शेअर्स गिफ्ट केल्याचे उघडकीस आले आहे, परंतु यात शेअर ज्याला दिलेत त्याचे नाव जाहीर केलेले नाही. इन्फोसिसमध्ये आता कुमारीची हिस्सेदारी ०.२१ टक्क्यांनी कमी झाली आहे आणि शिबुलाल यांच्या हिस्सेदारीत 0.05 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आता कुमारीचे 88,96,930 तर शिबुलाल यांचे 21,66,768 शेअर्स आहेत. सध्या बीएसईवर इन्फोसिसच्या शेअर्सची किंमत बीएसईवर प्रति शेअर 1,123.90 रुपये आहे. जुलैमध्ये शिबूलालच्या कुटूंबियांनी 85 लाख शेअर्स विकले होते, ज्यांची किंमत सुमारे 770 कोटी होती. या पैशांचा उपयोग परोपकार आणि गुंतवणूकीच्या कामांसाठी वापरला गेला.

एन.आर. नारायणमूर्ती आणि इतर पाच जणांसह एस.डी. शिबुलाल यांनी 1981 मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती. शिबुलाल यांनी  2011-2014 या काळात कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले. त्याआधी त्यांनी 2007-2011 मध्ये कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. सध्या ते एक्जिलॉर वेंचर्सच्या माध्यमातून टेक्निकल स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत आहेत. इन्फोसिसचे सहसंस्थापक ख्रिस गोपालकृष्णन यांच्यासह त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here