मारुती सुझुकीची ‘ही’ कार झाली क्रॅश टेस्टमध्ये नापास; मिळालेत 0 स्टार, वाचा कोणत्या कारला आहेत किती स्टार

मुंबई :

मारुती सुझुकी ही कंपनी सामान्य लोकांची मानसिकता लक्षात घेऊन कमी किमतीत जास्त मायलेज असणाऱ्या गाड्या तयार करते. सध्या मारुतीच्या अनेक गाड्यांची बाजारात चलती आहे. अशातच मारुती सुझुकीसाठी एक धक्कादायक बातमी आली आहे. ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.

मारुती सुझुकीच्या एस-प्रेसोसह एकूण ३ गाड्यांचे परीक्षण करण्यात आले. यात ह्युंदाई ग्रँड i10, किआ सेल्टोस याही गाड्यांचे परीक्षण झाले. ग्बोबल NCAP द्वारे यावेळी तीन मेड इन इंडिया कार्सचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये ह्युंदाई ग्रँड i10 या कारला 2 स्टार, किआ सेल्टोस या कारला 3 स्टार आणि एस-प्रेसो या कारला 0 स्टार देण्यात आले.

ग्बोबल NCAP ने काढलेले एस-प्रेसोचे प्रोब्लेम्स :-

  • या गाडीमधील चालक आणि सह-चालकाची छाती आणि मान बिलकुल सुरक्षित नाही.
  • चालकाचे गुडघेदेकील सुरक्षित नाहीत.
  • डॅशबोर्डमुळे सह-चालकाचे गुडघे थोडे सुरक्षित राहीले.
  • एस-प्रेसोच्या बॉडीशेललादेखील फार चांगलं रेटिंग मिळालेलं नाही.
  • अधिक लोडिंग झेलण्यास सक्षम नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here