प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची आत्महत्या! नैराश्यामुळे उचललं टोकाचं पाऊल

धर्मशाळा :

2020 हे मनोरंजन विश्वासाठी अत्यंत दुखःद वर्ष ठरले आहे. अनेक बडे आणि प्रसिद्ध अभिनेते बॉलीवूडने या वर्षात गमावले. तसेच विविध वाद आणि घटनांमुळे बॉलीवूड बदनामही झालं. अशातच अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. या मोठ्या वृत्तामुळे बॉलीवूड विश्वात खळबळ माजली आहे. पन्नाशी ओलांडल्यावर त्यांनी हे पाऊल उचलले त्यामुळे सर्वाना धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलेलं नाही.

गुरुवारी कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा मधील मॅक्डोलगंजच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ त्यांनी आत्महत्या केली आहे. या बातमीविषयी कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी सदर घटना घडली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. 

आसिफ बसरा UK मधील एका महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर कुत्र्याच्या दोरीलाच त्यांनी गळफास घेतला, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असण्याची शक्यता सांगितली जात आहे. ब्लॅक ‘फ्रायडे’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ अशा विविध हिंदी सिनेमात त्यांनी काम केले आहे. ते प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता होते.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here