आता ‘या’ देशातील पिकांची होणार महाराष्ट्राच्या मातीत लागवड; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पुढाकार

बारामती :

सध्या हवामानाचा मोठा विपरीत परिणाम शेतीवर जाणवतो आहे. आपल्याकडे पाणी नसलेल्या भागात तर शेती करणे कठीण होऊन बसले आहे. मात्र अधिक रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या तसेच कमी पाण्यावरही मोठे उत्पादन देणाऱ्या द्राक्ष,ऊस,संत्रा आणि ईतरही जपानी पिकांची येत्या काळात महाराष्ट्रात लागवड केली जाणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारातून महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची पुढाकारातुन जपानच्या कृषितज्ञांसमवेत बारामतीत काल याबाबत पहिली बैठक पार पडली. जपानचे कृषीतज्ञ मिशीहो हाराडा हे उपस्थित होते. सकाळी त्यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट देत येथील कृषी संशोधनासह प्रयोगाची पाहणी केली. त्या नंतर पार पडलेल्या बैठकीत महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.   

बैठक झाल्यावर त्यांनी म्हटले की, जपानमधील ओसाका ते हिरोशीमा या पट्ट्यात द्राक्षाची उत्तम शेती केली जाते. जपानमध्ये द्राक्षाला भावही चांगला मिळतो. शरद पवार यांच्याशी पुर्वी झालेल्या भेटीत त्यांना ही बाब सांगितली. या शिवाय कृषी क्षेत्रात जपान सरकारच्या मदतीने काही स्टार्ट अप सुरु करण्याबाबतची चर्चा बैठकीत करण्यात आली.

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट लवकरच त्यासाठी कृषि आराखडा तयार करणार आहे. त्यामुळे आपल्या मातीत जपानी कृषि आणि यांत्रिकीकरणाचे संशोधन रुजण्याचे संकेत आहेत. येथील कृषि विज्ञान केंद्रात पवार यांच्यासह द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह,काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमवेत जपानचे मिशीहो हाराडा यांची बुधवारी(दि ११) बैठक पार पडली. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here