हे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल

१) पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. 

२) नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

३) एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.

४) काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

५) समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. 

६) आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

७) जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा. 

८) गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं. 

९) आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

१०) चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here