म्हणून महेंद्रसिंग धोनी सुरु करणार कडकनाथ कोंबड्यांचं पालन; दिली ‘एवढ्या’ पिलांची ऑर्डर

मुंबई :

एखादा क्रिकेटर साधारणपणे रिटायर्ड झाल्यावर वेगवेगळ्या व्यवसायांशी कनेक्ट ठेवतो. आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या आधाराने चालणारे व्यवसाय करू पाहतो. पण आपल्या क्रिकेटचा माजी कर्णधार धोनी खरोखरच वेगळ्या विचारांचा आहे. शेतीला आधार म्हणून केला जाणार जोडधंदा म्हणजे कोंबडीपालन. आता अनेकांचा तो प्रमुख व्यवसाय बनला आहे. आता धोनी आपले शहर रांचीत झाबुआच्या कडकनाथ कोंबड्यांची विक्री करेल, असे वृत्त हाती आले आहे.

धोनीने मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या 2 हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डरही दिली आहे. धोनीकडून माध्यमातून झाबुआ येथील आदिवासी शेतकरी विनोद मैडा यांना 15 डिसेंबरपर्यंत आगाऊ पैसे देऊन 2 हजार कोंबडी देण्यास सांगण्यात आले आहे. आदिवासी भागातील विनोद यांनी सांगितले की, जेव्हा मी रांची येथे कडकनाथ पिल्लांची डिलिव्हरी देण्यासाठी जाईल तेव्हा मी धोनीसारख्या व्यक्तीला भेटणार आहे, याचा मला फार आनंद आहे.

धोनीने रांची येथील त्यांच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक मित्राच्या माध्यमातून या आदिवासी शेतकर्याशी संपर्क केला आणि ऑर्डर दिली. ‘ धोनीने आपल्या मित्रांमार्फत आमच्याशी संपर्क साधला होता पण त्यावेळी आमच्या केंद्रात पिल्ले नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना झाबुआ येथील थांदला येथील आदिवासी शेतकऱ्याशी संपर्क साधण्यास सांगितले, जे कडकनाथ कोंबड्याची फार्मिंग करतात’, अशी माहिती झाबुआच्या कडकनाथ कोंबडा रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. आयएस तोमर यांनी दिली. चरबीयुक्त आणि कोलेस्ट्रॉलमुक्त असणारा कडकनाथ कोंबडा काळ्या रंग, काळा रक्त, काळा हाड आणि गडद मांसासह चवीसाठी ओळखला जातो. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here