अबबब…चीनला सोसावं लागणार ‘एवढ्या’ हजार कोटींचं नुकसान, वाचा, कसा बसला दिवाळी झटका

दिल्ली :

आता दिवाळी आली असून देशातील बहुतेक बाजारपेठ खुल्या झाल्या आहेत. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकलला आणि स्वदेशीला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाचा या साथीच्या रोगानंतर लोकांनी आताशी कुठे मास्कसह मोकळा श्वास घेत खरेदीला सुरुवात केली आहे. कोरोनाशी मोठ्या ताकदीने लढल्यावर या मोठ्या साथीच्या काळानंतर दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण साजरा केला जात आहे. यासाठी ग्राहकांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक बाजारपेठांमध्ये मागील दोन दिवसांपासून खरेदीसाठी गर्दी केली आहे.

बाजारात तेजी आली असून ग्राहकांसह व्यापारीही आनंदी दिसत आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला तब्बल 60 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. कॅटच्या आवाहनावरून देशभरातील बाजारपेठांमध्ये चिनी वस्तूंवर पूर्णत: बहिष्कार टाकला जात आहे. दुसरीकडे व्यापारी चिनी वस्तूंची विक्री करीत नाहीत, तर ग्राहकही पूर्णपणे चिनी वस्तू खरेदी करण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे चीनला आधी रक्षाबंधन आणि आता दिवाळीचा मोठा झटका बसला आहे.

यावेळी खंडेलवाल यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. देशभरातील व्यापारी संघटनांसह राज्यांतील विविध कारागीर, हस्तकला कारागीर आणि इतर प्रमुख वस्तू उत्पादकांशी कॅटने संपर्क साधला आहे. त्यामुळे देशभरात अनेक नवीन डिझाईन्समध्ये स्वदेशी बनावटीच्या वस्तू दुकान, ऑफिस इत्यादींमध्ये विकल्या जात आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here