निवडणूक : भाऊ भाजपकडून माजी मंत्री; बहिणीची अपक्ष उमेदवारी, नात्यात पक्ष आडवा

अमरावती :

महाराष्ट्राच्या राजकारणात सोधा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. फक्त सोधाचा नाही तर आता बहिण-भाऊ, भाऊ-भाऊही वेगवेगळ्या पक्षाकडून लढताना दिसतात. नात्यापलीकडे जाऊन नात जपत राजकारण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. कधी कधी नात्यात कटुता आलेलीही महाराष्ट्राने पहिली आहे. आता अशीच एक घटना शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत समोर आली आहे.

भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहिण संगीता शिंदे यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल करत अमरावती विभागात होवू घातलेल्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत लढण्याचे ठरवले आहे तर भाजपकडून भाजपकडून नेते नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्री बोंडे हे कुणाच्या पाठीशी उभा राहणार असा प्रश्न निर्माण झाला असताना बोंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी पक्षासाठी काम करेन भाजप उमेदवार नितीन धांडेंसाठी सुद्धा मी भाऊ म्हणून तिला आशीर्वाद दिला आहे अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संगीता शिंदे यांनी म्हटले आहे की, माझे भाऊ भाजपचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहतील. पण मला लहान बहीण म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला आहे. आता या नात्याची आणि प्रेमाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.  

आपल्या भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या संगीता शिंदे आणि माजी आमदार अनिल बोंडे हे दोघेही घहीवरले. वडील व भावाचे पाय धुवून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली. यावेळी दोघांचे बहीण भावाचे अतूट प्रेम दिसून आलं. आता निकडणुकीत बोंडे आपल्या पक्षाचे उमेदवार नितीन धांडेंसाठी काम करतील की बहिनीला दिलेला आशीर्वाद पूर्ण करतील हा चर्चेचा विषय ठरला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here