‘हे’ शेअर्स आज होते तेजीत; गुंतवणूकदारांना मिळाला ‘एवढ्या’ टक्क्यांनी प्रॉफिट

मुंबई :

आज शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी पहिल्यांदाच १२६०० च्या पार आणि सेन्सेक्स 43300च्या पार होऊन बंद झाले. बँक आणि फायनेशियल शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. कमी आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये घसरण झाली असल्याचे समोर आले. त्याऐवजी फायनेन्स आणि इंडस्ट्रींड बँक आज टॉप गेनर्स आहेत. शर्मा टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक आज टॉप लूजर्स आहेत. आशियाई बाजारातही मोठी तेजी असल्याचे समोर आले.

बजाज फायनेन्समध्ये 9 टक्वे तेजी वाढली आहे आणि इंडसइंड बॅंकेमध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलटी, बजाज फिनसर्व, एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ओएनजीसी आजच्या टॉप गेनर्स आहेत. टेक महिंद्रा आणि एचसीएल टेकमध्ये 5 ते 6 टक्के घसरण झाली आहे. नेस्ले इंडिया, इन्फोसिस, सनफार्मा आणि टीसीएस आजचे टॉप लूजर्स आहेत.

बँक आणि फायनेशियल इंडेक्समध्ये 4 टक्क्यांच्या आसपास तेजी दिसून आली आहे. आयटी इंडेक्समध्ये  3.86 टक्के तर फार्मा इंडेक्समध्ये 4.11 टक्के कमी दिसून आली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here