भाजप नेत्याचा पुराव्यासह गौप्यस्फोट; ठाकरे कुटुंबातील ‘त्या’ सदस्याने खरेदी केली अन्वय नाईकांकडून जमीन, त्याची करा चौकशी

मुंबई :

सध्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण विविध अंगाने चर्चेत आहे. २०१८ला झालेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सध्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. आजच अर्णब गोस्वामींसह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. दरम्यान ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

‘ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत, असे म्हणत त्यांनी ही कागदपत्रेही ट्वीटरच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here