आईटी आणि फार्मा कंपन्यांकडे गुंतवणूकदारांनी केले दुर्लक्ष; ‘या’ शेअर्सकडे झुकला कल

मुंबई :

गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून तर आताच्या दिवाळीपर्यंत शेअर बाजारात जोरदार उलाढाल झाली. चढ-उतारा दरम्यान सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. आत्या गुंतवणूकदारांना दिवाळीही चांगली जाणार असल्याचे चित्र समोर आहे. गुंतवणूकदार आता फार्मा आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सपासून दूर जात आहेत. त्यांचा कल आता बँका, हॉटेल, विमान कंपन्या आणि पर्यटन कंपन्यांच्या शेअर्सकडे झुकलेला आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण हे आहे की आता सवर्सामान्य लोकांचे जीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. त्यामुळे या सेक्टरच्या कंपन्यांना मोठा लाभ होणार आहे.

मंगळवारी बीएसई हेल्थकेअर आणि आयटी निर्देशांकात चार टक्क्यांनी वाढ झाली. इंडियन हॉटेल्स, लेमन ट्री हॉटेल्स, इंटरग्लोब एव्हिएशन, ईआयएच, थॉमस कुक, वोंडरला हॉलिडे, पीव्हीआर आणि आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये 5 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली.

कार्वी कॅपिटलचे सीआयओ कुंजी बन्सल म्हणाले, “हॉटेल्स आणि मल्टिप्लेक्स सारख्या कोल्ड मूव्हिंग स्टॉक्समध्ये तेजी येऊ शकते. अमेरिकेतही नेटफ्लिक्स, टेलेडॉक हेल्थ आणि पॅलोटन यासारख्या कंपन्यांना घरातून कामाचा फायदा झाला. मात्र आता या शेअर्समधील तेजीही कमी झाली आहे.

हॉटेल और पर्यटन कंपनीचे शेअर्स तेव्हाच तेजीत येतील जेव्हा अर्थव्यवस्था 100 टक्के खुली होई आणि लोक सहली करण्यास सुरु करतील. तेव्हाच या क्षेत्रांची संपूर्ण परतावा मिळू शकेल, असा अंदाज विश्लेषकांनी सांगितला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here