नितीशकुमारांना कॉंग्रेसची थेट आणि जगजाहीर ऑफर; नितीश कुमार यांनी भाजप आणि संघाला सोडून…

मुंबई :

बिहार विधानसभा निवडणूकीत राजद आणि भाजपप्रणीत एनडीएमध्ये काल तुफानी टक्कर झाली. सर्वात जास्त सभा घेणाऱ्या राजद नेते तेजस्वी यादव यांनीही मोठी मजल मारली आणि राजद पक्षाला बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनवला. दरम्यान संयुक्त जनता दलाला भाजपपेक्षा कमी जागा आहेत. आजवर भाजप छोटा भाऊ म्हणून बिहारमध्ये होता मात्र या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला. त्यामुळे आता नितीशकुमार मुख्यमंत्री होणार की नाही? याबाबत शंका उपस्थित होत आहेत. अशातच नितीशकुमारांना कॉंग्रेसने जगजाहीर ऑफर दिली आहे.

‘नितीशजी, बिहार आपल्यासाठी छोटे झाले आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात यावे. सर्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवणारे लोकांचे एकमत करण्यासाठी मदत करावी. संघाची इंग्रजांद्वारे ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीला रुजू देऊ नका. विचार नक्की करा.  भाजप आणि संघाच्या विचारधारेला सोडून तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्या, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नितीशकुमारांना कॉंग्रेससोबत येण्याची ऑफर दिली आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, भाजप आणि संघ अमरवेलीसारखे आहेत. ज्या झाडाला वेढतात ते वाळून जाते. नितीशजी लालू यांनी आपल्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनात तुरुंगातही गेले आहेत. या अमरवेलीरुपी भाजप आणि संघाला बिहारमध्ये आश्रय देऊ नका.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here