अवघ्या तीन महिन्यात शिर्डी संस्थानचे सीईओ बगाटेंची बदली; ‘या’ प्रसिद्ध आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्याची नावाची चर्चा सुरु

शिर्डी :

साईबाबा संस्थानचे सीईओ के. एच. बगाटे यांची अवघ्या तीन महिन्यात बदली झाली असून महाराष्ट्र राज्य अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारीपदी वर्णी लागल्याने आता शिर्डी संस्थानची सुत्रे कोणाच्या हातात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्तीसाठी प्रथम पसंती तुकाराम मुंडे तसेच प्रविण गेडाम यांना आहे.

दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सि.ओ. के.एच. बगाटे यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सुत्रे दि.11 आँगस्ट 2020 रोजी घेतले होते. मात्र अवघ्या तिनच महिन्यात त्यांची बदली झाली असून महाराष्ट्र राज्य अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. यापूर्वी अरुण डोंगरे यांची देखील अवघ्या पाच महिण्याच्या कालावधीतच बदली झाली होती. त्यामुळे आता साईबाबा संस्थानचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्व साईभक्त ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे तसेच प्रवीण गेडाम यासारख्या अधिकार्‍यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.  देशात नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान तसेच अडिच हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या साईबाबा संस्थानवर प्रामाणिक आणि कडक अधिकारी नेमण्यात जेणेकरून संस्थानच्या हजारो कामगारांना न्याय मिळेल अशी मागणी कामगार वर्गामधून होत आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here