म्हणून अकोले नगरपंचायतचे नगरसेवक होऊ इच्छिणार्‍या अनेकांचे मनसुबे ढासळले; वाचा काय आहे विषय

अहमदनगर :

जिल्ह्यातील अकोले नगर पंचायतचे प्रभाग निहाय आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. मंगळवारी जाहीर झालेल्या आरक्षणमुळे एक दोन नगरसेवकांचे अपवाद वगळता सर्वच नगर सेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे बहुसंख्य नगरसेवक अडचणीत आले आहेत. आरक्षणामुळे नगरसेवक होऊ इच्छिणार्‍या अनेकांचे मनसुबे ढासळले आहेत. अकोले नगर पंचायतची प्रभाग निहाय आरक्षण सोडत मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पिठासन अधिकारी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. त्यांना तहसीलदार मुकेश कांबळे, मुख्याधिकारी. विक्रम जगदाळे, मंडलाधीकारी बाबासाहेब दातखिळे यांनी मदत केली.

कु. दिक्षा नितिन देठे, रेयांश राम माघाडे, कार्तिकी राजेंद्र शेणकर, प्रणिता प्रदीप आढाव, साक्षी सोमनाथ गायकवाड या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते सोडत काढण्यात आले. त्यानंतर या सतरा प्रभागांच्या आरक्षण सोडतीची घोषणा पीठासन अधिकार्‍यांनी क्रमाक्रमाने केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, प्रकाश नाईकवाडी, परशराम शेळके, संपतराव नाइकवाडी, अरुण रुपवते, नितीन नाईकवाडी, गणेश कानवडे, सचिन जगताप, निखिल जगताप, हितेश कुंभार, आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

आरक्षणाची प्रभागानुसार काढण्यात आलेली सोडत :-
प्रभाग क्रमांक एक -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक तीन -सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक चार – नागरीकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक पाच -, प्रभाग क्रमांक सहा- अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रमांक सात- सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक आठ- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक 10- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक 12- सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक 13- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक 14- नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक पंधरा- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 16- अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग क्रमांक- 17- सर्वसाधारण (महिला).

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here