म्हणून पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात नरमी; वाचा काय आहे कारण

दिल्ली :

बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात नरमी दिसून आली. कारण कोरोना लस लवकरच येणार असल्याच्या वृत्तामुळे परिस्थिती लवकरच सुधारण्याची आशा वाढली आहे. अशातच लोकांचा पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे जाणारा कल कमी झाला आहे.

कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर गोल्ड फ्यूचर्स 91 रुपये म्हणजेच 0.18 टक्क्यांनी घसरून ते प्रति १० ग्रॅम 50,410 रुपये झाला सिल्वर फ्यूचर्सचा भाव देखील 0.46 टक्के(287 रुपये) कमी होऊन प्रतिकिलो 62,757 रुपये होता. मंगळवारी स्पॉट मार्केटमध्ये सोने-चांदीची घसरण झाली. दिल्ली सराफा मार्केटमध्ये सोन्याचा भाव 662 रुपयांनी घसरून 50,338 रुपयांवर आला. चांदीची किंमतही 1,441 रुपयांच्या घट झाली आणि दर 62,217 रुपये प्रतिकिलोवर आला.

बुधवारी परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. कारण नव्याने येणाऱ्या अमेरिकेन पॅकेजकडून गुंतवणूकदारांकडून अपेक्षा आहेत. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वधारला आणि 1,879.31 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. अमेरिकन गोल्ड फ्यूचर्स 0.1 टक्क्यांनी वधारून ते 1,878.70 डॉलर प्रति औंस झाले. चांदी 0.2 टक्क्यांनी वाढून 24.26 डॉलर प्रति औंस झाली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here