भाजपला सोडचिट्ठी देणं शत्रुघ्न सिन्हाला पडलं भलतच महागात; वाचा, काय आहे प्रकरण

पटना :

एकेकाळी भारतीय सिनेसृष्टी आणि नंतरच्या कालखंडात बिहार तसेच देशच्या राजकारणात नाव कमावलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपला सोडचिठ्ठी देण चांगलच महागात पडलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा हे बिहार विधानसभा निवडणुकीत बंकीपूर मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर उभा होते. लव यालाही आता निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे  या ठिकाणी महागठ्बंधन आघाडीचा दबदबा असल्याचे सांगितले जात होते. आणि येथे लव याला भाजपच्या नितीन नवीन यांनी पराभूत केले.

एकूणच काय तर भाजपशी घेतलेला पंगा शत्रुघ्न सिन्हाला परवडला नाही. कारण आतापर्यंत त्याच्या कुटुंबाचा हा सलग तिसरा पराभव आहे. सुरुवातीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्याने पत्नी पूनम यांना समाजवादी पक्षातर्फे लखनौ मतदार संघातून भाजपचे राजनाथसिंग यांच्याविरोधात उभे केले होते पण पूनम यांचा ३ लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला होता. नंतर स्वतः शत्रुघ्न यांनीही त्यांच्या पारंपारिक पटना साहिब मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. पण येथेही भाजपच्या रविशंकर प्रसाद यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली होती.  

एकूणच काय तर थेट मोदींना आव्हान देत देशाच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून धोंडा पायावर मारून घेतला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देण सिन्हा कुटुंबाला चांगलच महागात पडलं आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here