म्हणून अॅमेझॉन सापडलं पुन्हा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात; वाचा, काय आहे कारण

मुंबई :

ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीची असणारी कंपनी अॅमेझॉन आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अॅमेझॉनकडून वादग्रस्त छपाई असलेल्या वस्तू विकल्या जात आहेत. अॅमेझॉनकडून हिंदू देवतांची चित्रे असलेल्या अंतर्वस्त्रांसह ॐ अक्षर लिहिलेल्या पाय पुसण्या विकत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आक्रमक होत नेटकऱ्यांनी अॅमेझॉनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

विशेष म्हणजे या वस्तू भारताबाहेर विकल्या जात आहेत. त्यामुके भारतीय नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर बायकॉट अ‍ॅमेझॉन हा ट्रेंड चालवत अ‍ॅमेझॉनच्या विरुद्ध थेट भूमिका घेतली आहे. अस्मिता आणि भावनिकता या दोन्ही मुद्द्यांवरून नेटकऱ्यांनी अॅमेझॉनला सुनावले आहे. परदेशातील भारतीयांनी #BoycottAmazon हा हॅशटॅगवापरून अ‍ॅमेझ़ॉनवर टीकेची झोड उठविली आहे. याआधीही अ‍ॅमेझॉनवर हिंदू देवतांच्या चित्रांची वस्त्रे, बूट विकल्याचे प्रकार घडले होते. यावेळीही भारतीयांनी विरोध केला होता.

देशावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना देखील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. पण सोशल डिस्टेसिंगचे नियम असल्यामुळे ग्राहक ऑनलाईन खरेदीलाच प्राधान्य देत आहेत. मात्र या दरम्यान समोर आलेल्या घटनेमुळे भारतीयांनी याविरोधात मोठी मोहीम सुरु करत अॅमेझॉन अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांच्या श्रद्धास्थानांचे फोटो छापलेल्या वस्तू विकल्या जातात. या छायाचित्रांचा वापर हाफ पॅन्टपासून ते अंडरगारमेंटपर्यंत केला जातो. परंतू हे कृत्य हिंदू संस्कृतीमध्ये चुकीचे  आहे, अशी आपली भूमिका नेटकऱ्यांनी स्पष्ट केली आहे.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here