बिहार विधानसभा निवडणूक : मुख्यमंत्रीपदी सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार, रचणार इतिहास

पटना :

बिहार विधानसभा निवडणूक २०२० निकालाची मतमोजणीला काल सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील हाती आलेल्या माहितीनुसार एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली होती. दुपारनंतर मात्र संपूर्ण चित्र पलटले. भाजपप्रणीत एनडीएची विजयी वाटचालीच्या दिशेनं आगेकूच सुरू झाली होती. अखेर बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांचे सरकार येत आहे.   

बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर NDAला बहुमत मिळालं असा दावा भाजपने केला आहे. यासह सातव्यांदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारमध्ये RJD हटवून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी सत्ता हातातून जाऊ दिली नाही. तेजस्वी यादव यांचा पराभव म्हणता येणार नाही. तेजस्वी यादव कदाचित सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले असतील पण लोकांनी त्यांच्या राजदला बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनवले आहे.

2000 च्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती मात्र काही दिवसांत त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे पडले. अखेर 2005 मध्ये बहुमत घेऊन नितीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. दरम्यान तेजस्वी यादव यांच्या पक्ष आरजेडीने बिहारमध्ये १४४ जागा लढवल्या आणि ७५ जागा जिंकल्या. बिहारमधील आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या राजकीय पक्षाला २३ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here