वाचा आणि पोटभर हसा… हे अस्सल जोक्स वाचून हसून हसून पोट दुखल्यास आमची जबाबदारी नाही

  1. गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
       तर
       तीन बायका एका तासांत
       किती पोळ्या बनवतील ?

   बंड्या : एकही नाही.
       कारण, ती एकटी आहे म्हणूनच  तर काम करते.
       तिघीजणी  मिळून फक्त गप्पा मारतील.
  2. लेटेस्ट पुणेरी किस्सा

   जोशी : “मी इथले टाॅयलेट वापरु का ?”
   नेने : “हो, पण पैसे पडतील….!”
   जोशी : “नाही पडणार…. बसताना काळजी घेईन….!!”
  3. पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.
   एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो.  तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?   
   पप्पूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.
  4. बायको: माझी एकअट आहे!
   नवरा : काय?
   बायको: तूम्ही या दिवाऴीत  सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार. ☺
   नवरा: माझी पण एक अट आहे?
   बायको: काय?
   नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?
  5. चिंगी : मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ?
   झंप्या : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
   चिंगी : कितीजण होते धावायला. ?
   झंप्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी….!!!
  6. बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.
   वडील : देवानं दोन पाय कशाला
               दिलेत..!
   बंड्या : एक किक् मारायला,
               न् एक गिअर बदलायला.
   लय हानला.! तंगड्या तुटेपर्यंत झोडला…
  7. शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन
   गण्या : ओके सर……पण जरा झणझणीत बनवा
  8. परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक काट्याने खातात,


   भारतीय….

   मुकाट्याने.
  9. मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
   इंग्रजीचे सर ओरडले.”व्हाय आर यू लेट?”
   इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.”
   सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”…
   हजरजबाबी मन्याने म्हटले,”सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!

10. गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात चपाती बुडवून खात होते…

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही…
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला ‘एक्स’
मानल आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here