छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हे’ विचार तुम्हाला नक्कीच देतील प्रेरणा; वाचा आणि शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द समस्त मराठी जणांसाठी प्रेरणादायी आहेत. फक्त शब्दच एवढी अफाट शक्ती निर्माण करत असतील तर खुद्द छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या किती प्रेरणादायी ठरतील, हे लक्षात घेऊन आज आम्ही आपल्यासमोर महाराजांचे विचार मांडणार आहोत.

  1. कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
  2. ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.
  3. जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वात विजयी पताका उभारु शकतो.
  4. शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.
  5. सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
  6. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
  7. एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
  8. स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

संकलन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here