स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्त्यासाठी झटपट बनवा रवा डोसा; रेसिपी वाचा एका क्लिकवर

सकाळी रोज नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांना नेहमी सतावतो.  इडली, डोसा, उपमा, पोहे हा आता नेहमीचा नाश्ता झालाय. पण यातूनही काही वेगळा नाश्ता हवा असेल पण वेळ कमी असेल तर तुम्हाला एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे झटपट बनणाऱ्या कुरकुरीत रवा डोशाचा.

झटपट रवा डोसा बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो

 1. 1 कप रवा
 2. 1 कप तांदूळाचे पीठ
 3. 2 टेबलस्पून मैदा
 4. 1 कांदा
 5. 1 टिस्पून जीरे
 6. 1 टेबलस्पून कोथिंबीर
 7. 1-2 हिरव्या मिरच्या
 8. चवीनुसार मीठ
 9. तेल गरजेनुसार

आता हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. एका बाऊलमध्ये तांदूळाचे पीठ, रवा, मैदा घेऊन पाणी घालून मिक्स करा. 10 मिनिटे तसेच ठेवून द्यावे. कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घाला. जीरे,मीठ घाला.
 2. पाणी घालून पातळ बॅटर बनवून घ्या. तवा गरम करून तेल लावून घ्या.
 3. पळीने बॅटर तव्यावर टाकून घ्या. खालची बाजू झाल्यावर पलटी करून छान भाजून घ्यावे.
 4. गरमागरम डोसा नारळाच्या चटणीसोबत खायला सुरुवात करा…. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here