सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पदार्थ; व्हा निरोगी आयुष्याचे धनी

निरोगी आयुष्य कुणाला नको असते, आणि निरोगी आयुष्यासाठी आपल्या आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींचे सानुत्ल्न साधता आले की पुरे आहे. आधी आपण आहाराविषयी बोलूया. अनेक लोक उशिरा उठतात त्यामुळे थेट जेवण करतात किंवा काही लोक नेमकं कामाला जायच्या वेळी उठतात आणि घाईघाईत नाश्ता करतात. दिवसभरासाठी उर्जा मिळवायची असेल तर सकाळी नाश्ता करणे महत्वाचे आहे. मात्र निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्लं पाहिजे? याविषयी आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. नाश्ता केवळ आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम करत नाही तर यामुळे मोठमोठ्या आजारांपासून देखील बचाव होतो.

  • – सफरचंद आणि संत्र्यांचं सेवन केल्यास ऊर्जा मिळण्यासह तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढते. संत्र्यामुळे पचन प्रक्रिया योग्य रितीने होते.
  • – एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसून पिणं फायदेशीर ठरेल. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील. सोबतच रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढते.
  • – रात्री बदाम भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास त्याचे सर्वाधिक फायदे शरीराला मिळतात.
  • – विशेषतः वजन घटवण्यासाठी सब्ज्याचा आहारात समावेश केला जातो. तसंच यामुळे शरीराची रोग प्रतिकारक यंत्रणा देखील चांगली राहते.
  • – अंड आणि पनीर दोन्ही शरीरासाठी पोषक आहेत. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी दोन्ही पदार्थ फायदेशीरच ठरतील. 

टोमॅटो, फ्रुट जॅम, दही हे पदार्थ रिकाम्या पोटी कधीच खाऊ नयेत.

संपादन : संचिता कदम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here